Monday, 8 May 2017

विहार... (भाग १ ते ४)

विहार...   भाग १
निळ्याशार समुद्रात रोजच्याप्रमाणेच अहमद होडी घेऊन निघाला. सोबतीला त्याचा वीस-एकवीस वर्षांचा कोवळा मुलगा इरफान होताच.खरं म्हणजे, आज मुलाला सोबत घेण्याची त्याची इच्छा नव्हती. भर समुद्रात मुलाला काही त्रास झाला तर काय हा प्रश्न आज पहिल्यांदा त्याला पडला होता. पण इरफान घरातही स्वस्थ बसला नसताच. इरफान क्रिकेट खेळायचा.सध्या कॉलेजला सुट्टी असल्यामुळे एकतर वडिलांसोबत समुद्रात जाणे किंवा क्रिकेट खेळणे एवढाच त्याचा उद्योग असायचा. पोरगं आपल्या नजरेसमोर असलेलं बरं असा विचार करून अहमद त्याला घेऊन निघाला.कोळीवाड्यातल्या इतर होड्यासुद्धा एव्हाना निघाल्या होत्या.समुद्रात बऱ्यापैकी आत गेल्यावर अहमदने  जाळे फेकले. आता तास-दोन तास वाट बघायची होती. इरफान एकीकडे काहीतरी टिवल्याबावल्या करत बसला होता. एरवी हा रिकामा वेळ अहमदला फार आवडायचा. दूरवर अथांग समुद्राकडे बघत त्याचा वेळ मजेत निघून जायचा. आज हीच वेळ त्याला खायला उठली होती. कितीही प्रयत्न केला तरी त्याचं लक्ष सतत इरफानकडे जात होतं.शेवटी निग्रहाने त्याने नजर दुसरीकडे वळवली.

"निळ्या पाण्यात तश्या बघण्यासारख्या कितीतरी गोष्टी असतात..मधूनच त्या पाण्याचं उचंबळून येणं..त्यातले तरंग..सूर्यकिरण आणि त्या तरंगांचं मिलन..मग बदललेला त्या पाण्याचा रंग…. सूर्यकिरण थेट आतमध्ये शिरल्यावर दिसणारा दगड….अचानक दिसणारी एखादी छोटी मासोळी..त्या मासोळीच्या आशेने येणारे समुद्रपक्षी...लगोलग मासोळीने घेतलेली डुबकी..आणि खोल पाण्यात अविरत सुरु असलेला मासोळीचा स्वछंद विहार.....स्वछंद विहार !!!"

अचानक अहमद भानावर आला. त्याला गेल्या दोन-तीन दिवसातले प्रसंग आठवले. काही दिवसापासून इरफानच्या पोटात दुखत होतं. गावातल्या डॉक्टरच्या औषधाने गुण येईना म्हणून अहमद त्याला घेऊन भरुचला गेला. तिथल्या डॉक्टरने सोनोग्राफी करायला सांगितली. सोनोग्राफीचा खर्च परवडण्यासारखा नसला तरी अहमदने ती करायचे ठरवले. रेडियोलॉजिस्ट इरफानच्या पोटावरून वारंवार कसलंतरी यंत्र फिरवत होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. इरफानच्या पोटात काहीतरी विचित्र दिसत होतं. साधारण अर्धा तास खातरजमा केल्यावर रेडियोलॉजिस्टने रिपोर्ट तयार केला.

"क्या हुआ है साहब?",अहमदने विचारलं.

"मैने रिपोर्टमें लिखा हैं सबकुछ. आपके डॉक्टरसे पूछ लिजिएगा."

खरं म्हणजे रेडियोलॉजिस्टचा  स्वत:च्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. त्याच्या सतरा वर्षांच्या कारकिर्दीत त्याने प्रथमच असं काहीतरी बघितलं होतं. त्याने थोडं घाबरतच तो रिपोर्ट बनवून अहमदला दिला. अहमद निघून गेल्यावर त्याने लगोलग इरफानच्या डॉक्टरांना फोन करून परिस्थिती सांगितली. त्या डॉक्टरांचाही विश्वास बसेना. दुसऱ्या दिवशी ते स्वतः इरफानला घेऊन त्या रेडियोलॉजिस्टकडे आले. त्यांनी स्वतःसमोर पुन्हा सोनोग्राफी करून घेतली. त्या दोघांची अगम्य भाषेतली चर्चा अहमद आणि इरफानच्या कानावर पडत होती. दोघेही गोंधळले होते. शेवटी डॉक्टरांनी इरफानला बाहेर पाठवून अहमदला बसवून घेतले.
"क्या हुआ है साहब? कुछ तो बोलीये"

"अहमद...."

"जी?"

डॉक्टरांना काही सुचेना. शेवटी त्यांनी एका कागदावर मानवी शरीराची रचना काढायला सुरवात केली. माणसाचे हृदय, फुप्फुस,अन्ननलिका,आतडे....आणि शेवटी किडनी त्यांनी त्या कागदावर दाखवली.
"अहमद हमारा शरीर कुछ इस तरह से बना हुआ है. यहा एक और वहा दुसरी किडनी होती है. किडनी समझते हो ना?"

"जी साहब"

"ये दोनो किडनीया इक-दुसरेसें जुडी हुई होती है. लेकिन इरफान के शरीर मे......" डॉक्टर थबकले.

"क्या हुआ साहब?"

"इरफान की किडनी जुडी हुई नही है!!"

"क्या?"

"हा..उसकी एक किडनी उसके शरीर मे घूम रही है !!", डॉक्टरांनी दीर्घ श्वास घेतला.

"ये क्या बोल रहे हो डॉक्टर साहब?"

"हा अहमद..पहले हमें भी यकीन नही हो रहा था."

"पर ऐसा कैसे हो सकता है?"

"ये तो नही पता. पर इसका इलाज यहा नहीं हो सकता.तुम इरफान को लेके नडियाद चले जाओ.”
थोड्या वेळाने अहमद तिथून निघाला.वारंवार विचारूनही त्याने इरफानला काही सांगितले नाही.परतीच्या प्रवासात अहमदच्या डोक्यात तोच  विचार सुरु होता की ही गोष्ट इरफानला सांगायची कशी.
कारण सद्यस्थितीत इरफानला कल्पना नसली तरी,

चोवीस तास इरफानच्या शरीरात त्याची एक किडनी स्वछंद विहार करत होती !!

क्रमश:विहार...भाग २
चोवीस तास इरफानच्या शरीरात त्याची एक किडनी स्वछंद विहार करत होती !!

हे सगळं आठवल्यावर अहमदच्या अंगावर शहारे आले. भानावर येताच आपण होडीवर असल्याचे त्याच्या ध्यानात आले. अहमदने त्याच्या बायकोला जास्त तपशील न सांगता फक्त नडियाडला जावे लागेल एवढेच सांगितले. तिला त्याचे गांभीर्य पूर्णतः: कळले नसले तरी ती चिंतातुर झालीच. नाडियाडला तिचा लांबच्या नात्यातला एक भाऊ राहायचा. त्याच्याकडे उतरता येईल असे तिने अहमदला सांगितलं. अहमदला या गोष्टीची काळजी नव्हतीच. त्याला डॉक्टरचे बोलणे आठवत होते.
"डॉक्टरसाहब इरफान ठीक तो हो जायेगा ना ?"

"अहमद..नडियाड के अस्पताल में बहोत अच्छे डॉक्टर्स है. वो कुछ ना कुछ रास्ता जरूर निकालेंगे.लेकिन..."

"लेकिन क्या साहब?"

"खर्चा बहोत हो सकता है ऐसा मेरा अंदाजा है"

"कितना होगा साहब?"

"वो तो नहीं बता पाऊंगा. अगर ऑपरेशन करना पडा तो लाख रुपये तक जा सकता है."

"इतना??"

"कर पाओगे क्या?"

"बहोत मुश्किल है साहब."

"हा..पर एकबार जाकर तो आओ वहा.फिर देखते है."

एवढे पैसे कुठून आणावे हे अहमदला कळत नव्हतं. पण नडियाडला जाण्याआधीच पैशाची व्यवस्था करणं भाग होतं. तिथे गेल्यावर पैश्याची धावपळ करणं अशक्य झालं असतं.   बँकेतले वगैरे मिळून चाळीसेक हजाराची व्यवस्था होती. सावकाराकडून पंधरा-वीस हजार उचलावे असं अहमदने विचार केला. त्यासाठी सावकाराकडे त्याला होडी गहाण ठेवावी लागली. नाडियाडला निघताना अहमदने जवळजवळ सत्तर हजार रुपये जवळ ठेवले. बायकोची नजर चुकवून स्वतःचा सोन्याचा गोफही त्याने डब्यातून काढून घेतला. त्याच्या बायकोची सोबत येण्याची इच्छा होती पण अहमदने तिला येऊ दिले नाही. शिवाय गरज पडली तरच तुझ्या भावाकडे जाईल असे त्याने ठणकावून सांगितले. आपण दोन-तीन दिवसातच वापस येऊ अशी एक वेडी आशा कुठेतरी त्याच्या मनात होती. शेवटी सगळी तयारी करून अहमद इरफानला घेऊन नडियाडला पोहोचला. तिथल्या मुलजीभाई पटेल इस्पितळात जायला त्याला सांगितले होते.

इस्पितळात पोहोचल्यावर तिथली गर्दी बघून ते दोघेही अवाक झाले. एवढी गर्दी आजपर्यंत त्यांनी फक्त  बस स्टॅन्डवरच बघितली होती. रिसेप्शनमध्ये न्यू केसेस आणि ओल्ड केसेस असे दोन विभाग होते. त्यातल्या न्यू केसेस विभागासमोर अहमद उभा राहिला. इरफानचे पोट दुखायला सुरवात झाली असल्यामुळे तो खुर्चीवर बसला होता. नाव,पत्ता विचारून झाल्यावर तिथल्या माणसाने अहमदला विचारले,
"क्या तक्लीफ है?"

"जी पेट में बहोत दर्द होता है इसलिये हमारे डॉक्टरसाहब ने......."

"किडनी में क्या तकलीफ है ?"

"जी वो.....",अहमदला काय सांगावे सुचेना.

"कोई रिपोर्ट्स लाये हो?"

"जी हा..ये लिजिए"

रिसेप्शनिस्टने त्यांना दोन तास बसावे लागेल हे सांगितले. अहमद इरफानजवळ आला. काहीतरी खाल्ल्यावर बरे वाटेल असं विचार करून दोघेही तिथल्या कँटीनमध्ये जाऊन आले. थोड्यावेळाने त्यांचा नंबर लागला. केबिनमध्ये गेल्यावर डॉक्टरने विचारले,
"पेट में दर्द है."

"हा",इरफान म्हणाला.

"तो ऐसे यहा क्यो लाये हो?",डॉक्टरने  अहमदला विचारले.

"जी वो हमारे डॉक्टरनेही यहा ले आने की सलाह दी."

"क्यो? ये किडनी हॉस्पिटल है"

"किडनी में ही तकलीफ है."

"क्या?"

इरफानसमोर बोलायची अहमदची इच्छा नव्हती पण आता नाईलाज होता.

"डॉक्टरसाहब इरफान की दोनो किडनीया आपसी में जुडी हुवी नहीं है. उसकी एक किडनी पेट में घूम रही है. शायद इसीलिये पेटदर्द होता है."

इरफान आणि डॉक्टर दोघेही आश्चर्यचकित झाले.
"क्या???? ये किसने बताया आपको?"

"हमारे डॉक्टरने."

"और आपने मान लिया. कमाल है!!"

"साहब रिपोर्ट में भी येही लिखा है. आप देख लिजिए"

"रिपोर्ट तो कुछ भी बनेंगे. ये छोटे-मोटे गाव के डॉक्टर यही करते है."

"आप एक बार देख तो लिजिए"

"ये नामूमकिन है. माफ किजीये लेकिन आपको बेवकूफ बनाया गया है"

"नहीं साहब"

"दिखाईये वो रिपोर्ट"

रिपोर्ट बघून डॉक्टरचा चेहरा गंभीर झाला. तो दुसऱ्या डॉक्टरांशी बोलायला बाहेर निघून गेला.थोड्यावेळाने येऊन तो अहमदला म्हणाला,
"आप ये सारी टेस्ट करावा लिजिए. और फिर एकबार सोनोग्राफीभी करनी पडेगी"

"सोनोग्राफी तो हो गयी हैं ना"

"इस रिपोर्टपे हम भरोसा नहीं कर सकते. प्लीज आप सोनोग्राफी कर लिजिए."

अहमद हो म्हणून बाहेर आला.सगळ्या टेस्ट्स आणि सोनोग्राफी करेपर्यंत संध्याकाळ झाली होती. इरफान अजूनही बाहेर आलाच नव्हता.अहमद परत त्या डॉक्टरांना भेटला. 
ते म्हणाले,
"हमने इरफान को ऍडमिट कर लिया है. आप बाहेर जाके फॉर्म और पैसे भर दीजिये."

"जी वो रिपोर्ट?"

"वो मैं देख लुंगा"

"ठीक है. मैं पैसे भरता हू. सब मिलके कितने पैसे खर्च हो सकते है कुछ बतायेंगे?"

"आप फिकीर मत किजीये. कम से कम पैसे लगे इसकी हम कोशिश करेंगे."

डॉक्टरांनी काही गोष्टी अहमदला सांगितल्याचं नाही ज्या त्याला नंतर इरफानकडून कळल्या. इरफानच्या केसने आज त्या हॉस्पिटलमध्ये खळबळ माजविली होती. त्याची सोनोग्राफी करताना हॉस्पिटलच्या प्रमुख डॉक्टरसमवेत आठ डॉक्टर्स तिथे हजर होते. कोणीही अशी केस याआधी बघितली नव्हती. ही केस त्या सर्व डॉक्टरांसाठी एक आव्हान होतं. पण भारतातलं सर्वोत्कृष्ट किडनी हॉस्पिटल म्हणून  आपण ही केस सोडवू शकतो असा प्रमुख डॉक्टरांना विश्वास होता.

इरफानला ऍडमिट केल्यावर आता अहमदला स्वतः:च्या राहण्याची सोय करायची होती. पण आता खूपच उशीर झाला होता. बाहेरच्या बाकड्यावर काही पेशंट्सचे नातेवाईक झोपले असल्याचे त्याने पाहिले. त्याने आजची रात्र तिथंच झोपायचं ठरवलं. इरफानची काळजी वाटत असली तरी फार खर्च येऊ देणार नहीं असे डॉक्टरने सांगितल्यामुळे अहमद जरा निश्चित होता. अहमदचा लगेच डोळा लागला. रात्री काहीश्या कुजबुजीने त्याला जाग आले. बाजूचे दोन माणसं बोलत होते.

"ट्रान्सप्लांट तो हो गया आज. एक टेन्शन निकाल गया सरसे."

"हा पर अभी डिस्चार्ज मिलने को टाइम लगेगा."

"कोई बात नहीं. देख लेंगे."

"और पैसे का इंतजाम कर लिया क्या?"

"हा आज और पाच लाख रुपये मंगवा लिये है घरसे. कल चाचाजी लेकर आयेंगे."

पाच लाख ऐकून अहमद खडबडून उठला.

"ट्रान्सप्लांट के बाद भी इतने पैसे लगेंगे?"

"एक इंजेक्शन की किंमत एक लाख अस्सी हजार है. ऐसे दो देने है."

अहमद आता उठून बसला होता. आपल्यासमोर नियतीने काय वाढून ठेवले आहे ह्याची त्याला आता पूर्ण कल्पना आली  होती !!

क्रमश:
विहार..भाग ३
रात्रभर अहमदला झोप लागली नाहीच. सकाळी उठल्यावर तो इरफानला भेटायला गेला. इरफानला रात्री थोडा त्रास झाला होता. तिथल्या डॉक्टरने पेनकिलर देऊन त्याला झोपविले. डॉक्टरने अहमदला काही औषधं लिहून दिली. हॉस्पिटलच्या आवारात संस्थेचेच एक औषधांचे दुकान होते जे चोवीस तास सुरु असायचे. ते दुकान शोधता शोधता अहमदने पूर्ण दवाखाना फिरून घेतला. त्याच्या कल्पनेपेक्षा फारच मोठे हॉस्पिटल होते ते. अर्थात तिथे येणाऱ्या रुग्णांची संख्याही तेवढीच मोठी होती. हे सगळं बघितल्यावर इरफानला आपण योग्य ठिकाणी आणल्याचं अहमदच्या लक्षात आलं. पण एक मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित होता......इरफानच्या इलाजाचा खर्च!!! त्यासाठीच आज अहमदला कोणत्याही परिस्थितीत मोठ्या डॉक्टरांना भेटायचे होते.

थोडी चौकशी केल्यावर हॉस्पिटलच्या मागच्या कॉलनीमध्ये राहायला खोली मिळते असे अहमदला कळले. अहमद तिथे गेला. जवळजवळ प्रत्येकच घरातली एखाद-दुसरी खोली हे पेशंट्सच्या नातेवाईकांना भाड्याने देण्यासाठी उपलब्ध होती.काही पेशंट्सचे नातेवाईक तर दोन-तीन महिन्यांपासून तिथेच राहत होते. हा प्रकार अहमदला जरा विचित्र वाटला. एवढे दिवस राहण्याची गरज का पडत असावी हे त्याला कळत नव्हतं. अर्थात दिवसाचे दोनशे रुपये देऊन खोली घेणं अह्मदला पटलं नाही. आता बायकोच्या भावाला (सलीम) संपर्क करण्याशिवाय पर्याय नव्हता. भाऊसुद्धा जवळच राहायचा. तो लगेच अहमदला भेटायला आला. शक्यतो हॉस्पिटलच्या रिसेप्शनमध्येच झोपायचे पण अगदीच गरज पडल्यास सलीमकडे जायचे असे अहमदने ठरवले. अहमदचा रोजचा डबा सलीमच्या घरून येणार होता. इरफानला हॉस्पिटलमध्ये मिळणारे जेवण सोडून अन्य काही खाण्यास मनाई होती.

दोन-तीन दिवस अशेच गेलेत. अहमदची मुख्य डॉक्टरांशी भेट होत नव्हती. वॉर्डातले डॉक्टर काही सांगत नव्हते. एक दिवस अहमद इरफानजवळ बसला असताना त्याला मुख्य डॉक्टरांचा भेटण्यासाठी निरोप आला. अहमद लगबगीने तिकडे गेला.
"आओ अहमद भाई. सलाम वालैकूम!"

"वालैकूम अस्सलाम डॉक्टरसाहब!"

"कैसे हो?"

"ठीक हू साहब. दो-तीन दिनो से आपसे मिलना चाह राहा था..लेकिन.."

"हा..पर तब मेरे पास तुम्हे बताने के लिये कुछ नही था."

"हुआ क्या है साहब?"

"अहमद..इरफान की केस बहोत अलग है. शायद दुनिया की ये पहली ऐसी केस है जिसमे इन्सान की दोनो किडनीया जुडी हुवी नही है. इन दो-तीन दिनो में हमने दुनियाभर के बहोत सारे केसेस देखे. कुछ एक्सपर्टसे बात भी की है..लेकिन किसीके के पास कोई ठोस जवाब नही है."

"ये क्या केह रहे हो साहब?"

"बहोत सोचविचार के बाद हमने इरफान दोनो किडनीया सर्जरीसे जोडने का फैसला किया है. पर ये इक तरह का प्रयोग ही होगा."

"क्या ऐसा हो सकता हैं?"

"हम विश्वास हैं के जरूर कामयाब हो जायेंगे."

"जैसा आप सही समझे साहब."

"आपकी सहमती हो तो  हम आगे बढ सकते  हैं"

"मैं क्या सहमती दूंगा डॉक्टरसाहब? बेटेसे बढकर किसी के लिये क्या हो सकता हैं!!...लेकिन.."

"क्या हुआ अहमद?"

"साहब..खर्चा कितना हो सकता हैं?अंदाज मिल जाये तो मैं इंतजाम करता हू."

"अहमद खर्चा बहोत ज्यादा हैं. युकी ये हमारे लिये भी एक प्रयोग हैं, हमारा कोई भी डॉक्टर इरफान के इलाज की फीज नहीं लेंगा..सर्जरी की भी नहीं. पर बाकी सारा खर्चा तुम्हे करना होगा.तकरीबन चार से पाच लाख रुपये लग सकते हैं."

अहमद डॉक्टरांच्या चेहऱ्याकडे बघत राहिला.

"क्या तुम इतना कर सकते हो अहमद?"

काही तरी ठरवून अहमद म्हणाला,
"पता नही साहब..पर आप इलाज सुरू किजीये. मैं कुछ भी करके पैसे जमा करुंगा."

"ठीक हैं..पर तुम्हे अभी एक लाख रुपये जमा करने होगे."

"कल तक समय मिल सकता हैं?"

"हा जरूर"

जाता जाता अहमदने डॉक्टरांना एक प्रश्न विचारला,

"सबकुछ ठीक तो हो जायेगा ना डॉक्टरसाहब?"

"खुदा पे भरोसा रखो अहमद!"

हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यावर अहमदने सर्वात आधी सोन्याचा गोफ आणि हातातली अंगठी सोनाराकडे विकली. जवळचे पैसे आणि दागिन्यांचे असे मिळून एक लाख रुपये त्याने संध्याकाळी हॉस्पिटल मध्ये जमा केले. इरफानला त्याने यापैकी काहीही सांगितले नाही. बाकी पैसे जमवण्यासाठी त्याला तीन-चार दिवस गावी  जाणे भाग होते. काही पैसे सलीमला देऊन अहमद गावी निघाला. गावी गेल्यावर अहमदने बायकोला पूर्ण परिस्थिती सांगितले. तिचे डोळे पुसतानाच काही झालं तरी आपण या परिस्थितीचा मुकाबला करायचाच असे त्याने मनोमन ठरवले. एक -दोन दिवसात त्याने बायकोचे दागिने, घरातले चांदी-पितळेचे भांडे आणि अन्य काही गोष्टी विकून साडे-तीन चार लाख रुपये जमवले. आणि तो नाडियाडला वापस आला. इरफानची ट्रीटमेंट आता वेगाने सुरु होती. अहमद वापस येताच तीन दिवसांनी इरफानची सर्जरी झाली. त्यात डॉक्टरांना म्हणावे तसे यश आले नाही.

अहमदचा दिनक्रम आता ठरला होता. सकाळी सहाला उठून तो स्वतःच आवरून इरफानजवळ येऊन बसायचा. इरफानचा चहा-नाश्ता झाल्यावर अहमद वॉर्डमधल्या सगळ्या पेशंट्सची विचारपूस करायचा. एखादा पेशंट एकटा वगैरे असल्यास अहमद त्याच्याही जवळ बसायचा. दुपारी इरफानच्या जेवण्याच्या वेळी अहमद आवर्जून त्याच्याशी गप्पा मारायचा. हॉस्पिटलच्या कँटीनमधलं जेवण इरफानला आवडायचा नाही. पण त्याला बाहरेच काहीही खायला मनाई होती. अश्यावेळी अहमद त्याच्याशी क्रिकेटच्या गप्पा मारून त्याला रमवायचा. इरफानही त्याच्या क्रिकेटच्या आठवणी अहमदला सांगायचा.

दिवसामागून दिवस जात होते. डॉक्टरांचे प्रयत्न सुरूच होते.पुढच्या काही दिवसात इरफानचे आणखी एक ऑपरेशन झाले. याकाळात अहमद इतर सगळ्या पेशंट्सला पाहत होता. किडनी ट्रान्सप्लांटसाठी कुवैतवरून भारतात आलेला एक शेख. अवाढव्य शरीरयष्टीचा हा शेख लहान बाळासारखा कळवळून रडायचा.गडगंज श्रीमंत असलेल्या शेखकडे बघायला त्याचं जवळचं कोणीही नव्हतं. उत्तरप्रदेशावरून आलेल्या हरीशची कथा निराळीच होती.एका रेल्वे अपघतानंतर झालेल्या ऑपरेशनमध्ये डॉक्टरकडून झालेल्या चुकीमुळे एक छोटी कात्री त्याच्या पोटातच राहिली. त्या कात्रीने हरीशची किडनी जायबंदी केली होती. असे कितीतरी पेशंट्स अहमद रोज बघायचा. रोज समुद्राकडे बघताना या अथांग विश्वात आपण किती नगण्य आहो ही त्याची भावना आता प्रत्यक्षात उतरत होती.

गेल्या तीन महिन्यात इरफानचे चार ऑपरेशन झाले. चौथ्या ऑपरेशनमध्ये इरफानच्या किडन्या जोडण्यात डॉक्टरांना यश आले. किडनी जायबंदी न करता जोडणे ही डॉक्टरांसाठी खूप मोठी अचिव्हमेंट होती. डॉक्टर समाधानी होते. पण या सगळ्यासाठी जवळपास पंधरा लाख रुपये खर्च आला होता. पण अजिबात पुढेमागे न बघता अहमदने राहतं घर, घरातल्या सर्व गोष्टी, आणि त्याच्या उपजीविकेची होडीसुद्धा विकली. नवीन घरमालकाने अहमदची गरज बघता काही दिवस घरात राहण्याची मुभा दिली. अहमदसमोर बरेच प्रश्न होते. पण मुलगा वाचला हे त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं होतं.

एके दिवशी डॉक्टरांनी अहमदला बोलावलं.
"आओ अहमद. मुबारक हो!!"

"सब आपकी मेहेरबानी हैं साहब"

"इरफान अब ठीक हैं. तुम उसे घर ले जा सकते हो"

"आपको शुक्रियादा कैसे दु साहब!! आप खुदा हो!"

"नही अहमद ये खुदाकी हम सब पे मेहेरबानी हैं! वैसे......"

"क्या हुआ साहब?"

"इरफान करता क्या हैं? पढता हैं??"

"जी वो आयटीआय का स्टुडंट हैं"

"ओह्ह !"

"क्या हुआ साहब?"

"अहमद..इरफान अब मेहनतवाले काम नाही कर पायेगा.हमें उसका खयाल रखना होगा."

"मतलब?"

"उसे आराम करना हैं. अभी भी और आगे भी. आयटीआयवाला जॉब वो नहीं कर सकता."

"क्या केह रहे हो साहब? कभी ना कभी तो इरफान को नौकरी करनीही पडेगी ना..मेरे बाद क्या होगा?"

"हा जरूर इरफान नौकरी करेगा. पर ज्यादा भागदौडवाली नहीं"

"ठीक हैं साहब"

"मायूस मत होना अहमद.खुदा के दुवा से सब ठीक हो जायेगा!"

"ठीक हैं."

अहमद खुर्चीवरून उठला. दरवाज्यापर्यंत गेल्यावर तो क्षणभर थांबला. तो म्हणाला,
"डॉक्टरसाहब इन्शा अल्लाह सबकुछ ठीक हो जायेगा!!....लेकिन"

"लेकिन?"

"क्या इरफान फिर कभी क्रिकेट खेल पायेगा?” अहमद डोळे पुसत म्हणाला.


क्रमश:

विहार...भाग ४ (अंतिम)
वॉर्डमधल्या डॉक्टरांनी अहमदला सांगितले,
"उद्या सकाळी इरफानला डिस्चार्ज मिळणार."

एकीकडे मुलगा बरा झाल्याचा आनंदामुळे अहमदच्या चेहऱ्यावर हसू होते. पण मनात कुठेतरी तो अस्वस्थ होता. गेले कित्येक दिवस एक प्रश्न स्वत:ला विचारण्यापासून त्याने अडवून धरला असला तरी आता ती वेळ आली होती. असा प्रसंग कदाचित सगळ्यांच्याच आयुष्यात एकदातरी येतोच. उद्याच्या अंधकारमय भविष्यात जायला मनसुद्धा कचरत असते. त्यामुळे हा आनंदाचा क्षण कधी संपूच नये असे वाटून जाते.

"आता पुढे काय????",अहमदने स्वतःला विचारले.

घरी जायला मिळणार म्हणून इरफान खुशीत होता पण त्याला न्यायचे तरी कोणत्या घरी? नवीन घरमालकाने दिलेली मुदत संपल्यावर अहमदच्या बायकोने बिऱ्हाड तात्पुरते तिच्या माहेरी हलवले होते.इरफानला तिथे नेण्याशिवाय पर्याय नव्हता.पण किती दिवस? पुढील काही दिवस इरफानची काळजी घेणं आवश्यक होतं. त्याच्या महिन्याच्या औषधांचा खर्च तीन-चार हजाराच्या घरातला असणार हे अहमदला जाणवले. कुटुंबाच्या उपजीविकेचं साधन असलेली होडीसुद्धा आता साथीला नव्हती.

अहमद अस्वस्थ होऊन वॉर्डात येरझाऱ्या घालत होता. त्याचवेळी त्याला बाजूच्या पेशंटचा मुलगा येताना दिसला. तोसुद्धा जरा टेन्शनमध्ये वाटत होता. हे कुटुंब महाराष्ट्रीयन होतं. वडिलांच्या किडनी स्टोनच्या ऑपरेशनसाठी तो आईवडिलांसोबत आला होता. अहमदला बघून तो हसला.
"कैसे हो अहमद चाचा?"

"ठीक हू बेटा. दवाईयां लाने गये थे?"

"हा"
"कुछ परेशान लग रहे हो."

"नहीं..दिनभर भागदौड चल रही थी.इसलिये थोडा थक गया हू. इरफान कैसा हैं? कल डिस्चार्ज मिलनेवाला हैं तो खुश ही होगा."

"हा..खुश हैं"

"चलो अच्छा हैं. चाचाजी आपसे एक बात केहनी थी."

"हा कहो बेटा"

"आपके जैसा इन्सान मैने कभी नहीं देखा."

"ऐसा क्यो केह रहे हो?"

"मैं यहा आने के बाद आपने नसीब को कोस राहा था.मेरे पिताजी के साथ ही ऐसा क्यो हो रहा हैं वगैरा वगैरा.  देखा जाये तो  इरफान के सामने मेरे पिताजी का केस कुछ भी नहीं हैं. पर मैने आपको कभीभी नसीब को कोसते हुये नहीं देखा. इरफान के सामने आपने एक बार भी अपना दर्द नहीं जताया. उसके सामने आप हमेशा मुस्कुराते रहते हैं. इरफान बता रहा था की आप एक छोटेसे गाव में  मछुआरे हैं.माफ किजीयेगा, लेकिन मुझे आपकी हालत का अंदाजा हैं. इरफान के ऑपरेशन के लिये कितना पैसे लगा होगा इसका भी मैं अंदाजा लगा सकता हू. पर आपको एक बात बताऊ? इरफान के जगहं अगर मैं होता, तो मेरे पिताजी शायद इससे भी ज्यादा पैसा आसानीसे लगा देते. पर आपके जीतनी हिम्मत हमारे पुरे खानदान में कोई नहीं जुटा पाता. इन दिनो इरफान और आपसे काफी लगाव हो गया हैं. पैसे के बारे में आपकी हालत देखके मुझे इरफान कि चिंता होती हैं. पर जब मैं आपके तरफ देखता हू तो मैं निश्चिन्त हो जाता हू."

अहमद त्याचं बोलणं ऐकून थक्क झाला होता. स्वतःच एवढं कौतुक त्याने कधीच ऐकलं नव्हतं. तो मुलगा चुकीचंही बोलत नाहीये हे अह्मदला जाणवलं.पण त्याचवेळी स्वतःची परिस्थितीही त्याला जाणवली. तो त्याला अडवून म्हणाला,

"शायद तुम सही केह रहे हो बेटा.अबतक तो मैने हिम्मत जुटायी थी.पर अब मैं हार चुका हू. मेरे पास अब कुछ भी नहीं हैं. ना घर,ना पैसे ! जिस  नावं के सहारे मेरा घर चलता था अब वो भी नहीं हैं."

"चाचाजी भलेही ये बात मैने आपसे ही सीखी हैं. पर अब आपको ही बताना चाहुंगा."

"कौनसी बात?"

"चाचाजी नावं नहीं हैं तो क्या हुआ...पुरा समंदर आपका हैं!!!"

आता अहमद खरोखर स्तब्ध झाला! त्याला ज्या प्रेरणेची गरज होती ती त्याला अनपेक्षितपणे मिळाली होती. अहमदला हायसं वाटायला लागलं. त्या मुलाला धन्यवाद देऊन अहमद इरफानजवळ आला. इरफान शांत झोपला होता. त्याच्या चेहऱ्याकडे बघून अहमदने मनोमन काहीतरी ठरवले.

सकाळी लवकर उठून अहमदने सगळ्या डिस्चार्ज फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या.तिथून निघण्याआधी अहमदने वॉर्डातल्या सगळ्या पेशंट्सची भेट घेतली. मुख्य डॉक्टरांना भेटून त्यांचेही आभार मानले. इरफानला घेऊन तो सलीमच्या घरी गेला. या काळात सलीम आणि कुटुंबीयांनी अहमदला प्रचंड आधार दिला होता.अहमदने सलीमला मिठी मारून त्याचे आभार मानले. दुसऱ्या दिवशी इरफानला घेऊन अहमद त्याच्या गावी परतला. भविष्य अनिश्चित होतं पण अहमद निश्चयी होता. काही दिवसांतच अहमदने एक खोली भाड्याने घेऊन बिऱ्हाड तिथं हलवलं. उपजीविकेचा प्रश्न अजून सुटायचा होता. एका मित्राकडून होडी भाड्याने घेऊन परत मासेमारी सुरु करायचं त्याने ठरवलं.मित्रानेही कमी भाड्यात आनंदाने अहमदला होडी दिली. बाकी खर्चांसाठी अहमदने रात्रपाळीतही कुठेतरी काम करायचं ठरवलं.

ठरल्याप्रमाणे पहिल्या दिवशी अहमद होडी घेऊन निघाला. नेहमीच्या ठिकाणी पोहोचल्यावर अहमदने होडी थांबवून माश्यांचे जाळे बाहेर काढले.

आणि,
"अनिश्चित भविष्याला काबीज करण्यासाठी अथांग समुद्रात दूरवर जाळे फेकले!!"

 समाप्त.

2 comments: