Friday, 27 May 2016

इंग्लिश विन्ग्लीश !

मी इंग्रजी सिनेमे पाहण्याचे जवळजवळ थांबवल्यापासून माझ्याकडे तुच्छतेने पाहणाऱ्या नजरा वाढल्या आहेतखरं म्हणजे माझ्या पाहण्या  पाहण्यामुळे या सिनेमांच्या लोकप्रियतेत किंवा अर्थकारणात काहीही फरक पडत नाही.  फरक केंव्हा पडतो तर जेंव्हा चार लोकांत मी अमुक अमुक सिनेमा पहिला नाही असे कबूल करतो तेंव्हा.
"नाही...मी नाही पहिला अवतार"
"कायतू अवतार नाही पाहिलास?", खुर्चीवरून उसळत माझा कलीग मला विचारतो.
"नाही"
"मूर्ख आहेस का तू ? तुला कळत नाहीये तू काय गमावलं आहेस!!!"

हे प्रातिनिधिक संभाषण नेहमी,"तुझे पता हैं तुने किसका कॅच छोडा हैं?" या आवेशात सुरु होतंआणि शेवटी "गाढवाला गुळाची चव काययावर संपतं.  आता मी इंग्रजी सिनेमे सहसा पाहत नाही यामागे हिंदी/मराठी  सिनेमावर असलेले प्रेमगोऱ्या लोकांचा रागभारतीय संस्कृतीरक्षणाचा घेतलेला वसा असे कुठलेही कारण नसून, ' बा...आपल्याला कळत नाहीएवढे एकमेव कारण आहेमला मान्य आहे की मी गाढव असेल,मला गुळाची चव नसेल वगैरे वगैरेपण माझा गाढवपणा स्वतपुरता मर्यादित ठेऊन जर मी इतर गाढवांना 'गुळाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणामयावर व्याख्यान देत नसेल तर काय प्रॉब्लेम आहेअरे बाबांनो..नाही ना झेपत आम्हाला !

"असं कसं झेपत नाही रे तुला ? इंग्लिश समजत नाही म्हणूनशिकला असशीलच ना?"

"इंग्लिश समजतेइंग्लिश सिनेमे नाही समजत !!"

"पण का ? ते फालतू हिंदी सिनेमे बरे समजतात.....इर्रीटेटिंग...इल्लॉजिकल ..होपलेस मुवीज !!"

"हे बघ बरेचसे हिंदी सिनेमे सुद्धा समजण्यापलीकडे असतात...इल्लॉजिकल असतात हे मान्य .पण सिनेमा फालतू होता असे म्हणण्याची मुभा असते तिथेइंग्लिशचं तसं नाही...तो आवडावाचं लागतो."

"असं काही नाहीये"

बरं...मग आजपर्यन्त तुला  आवडलेल्या एक तरी इंग्लिश सिनेमाचं नाव सांग."

"..............................................................................." (पंधरा सेकंदाचा पॉझ )

"आठवला?"

"अरे पण कितीतरी चांगले इंग्लिश सिनेमे आहेत त्याच काय?"

"हजारोनी असतील....पण त्यातला एकही इर्रीटेटिंग नव्हताप्रत्येक सिनेमाच लॉजीक १०० टक्के कळलं तुला?"

"प्रत्येक सिनेमा १०० टक्के कळलाच पाहिजे असं काही नियम आहे का ?"

"नाहीये ना...पण मला कळला नाही असही म्हणता येत नाहीप्रत्येक इंग्लिश सिनेमावर ठरलेल्या कॉमेण्ट्स द्याव्या लागतातत्या नाही दिल्या तर आपल्याला सिनेमा बघण्याची अक्कल नाही असे सांगितले जाते."

"कोणत्या ठरलेल्या कॉमेण्ट्स."

"सांगतो ना...ऑस्सम मुव्ही यार क्या कन्सेप्ट है (सिनेमा जितका आवडला तितका ऑस्समचा 'स्सलांबवत न्यायचाकिंवा काय इफ़्फ़ेक्ट आहेत यार खूपच आवडले मला किंवा पेहले पार्ट से भी अच्छा बनाया इस बार किंवा धीस इज दी बेस्ट जेम्स बॉण्ड मुव्ही एव्हर!"

मग त्यात काय चुकीच आहे ?"

"थांब ना जरा..सिनेमा आवडला किंवा कळला नसेल तर ह्याच कॉमेण्ट्स कश्या असतात बघ....अच्छी मुव्ही थी यारकन्सेप्ट सबके समज मी नही आयेगा लेकीन (म्हणजे ह्याला कळलेला नाही!!) किंवा स्टोरी जाऊदे रे इफ्फेकट्स कसले आहेत बघ ना (म्हणजे स्टोरीत दम नाही!) किंवा मस्त बनाया इसबार..पेह्लेवाले पार्टसे ज्यादा कनेक्क्शन नही है ये अच्छा किया (अरे मग कशाला बनवला?) किंवा मुव्ही छोड रे...ग्यॅझेट्स देखे क्या बॉण्ड के !!( (आता हेच राहिलंय..बाजारातसुद्धा रिमोटवाल्या कार मिळतात आजकाल...एलइडी वाले घड्याळसुद्धा मिळतात)

“........................................ (पाच सेकंद पॉझम्हणजे काहीतरी बघण्यासारखं असतंच रे त्या सिनेमांमध्ये."

"पण ते जर मला नसेल बघायचं तर?"

"हे बघ त्याच त्याच घीस्यापीट्या स्टोऱ्या बघण्यापेक्षा हे बघणं केंव्हाही चांगलं"

"ज्युरासिक पार्क बघितला असशील ना?"

"तुला तो सुद्धा आवडत नाहीहद्द झाली आता!"

"मला खूप आवडतो तो सिनेमा..पण पहिल्या आणि दुसऱ्या सिनेमाच्या स्टोरीत काय फरक होतातोच डायनासोर आणि तीच धावणारी माणसं...बरं एकदोन वेळा कौतुक...तिसऱ्या सिनेमात काय वेगळं होतंतीच घीसीपीटी स्टोरी."

"अरे पण शेवटी ज्युरासिक पार्क आहे तो...स्पीलबर्ग यार !!!"

"चल ठीक आहे...स्पीलबर्गच्या सन्मानार्थ सगळं मान्य...पण दुसरा डायरेक्टर डायनासोरच्या जागी गॉडझीला आणतोस्टोरी बदलली ? तिसरा डायरेक्टर डायनासोर आणि किंगकॉँग यांच्यात भांडणं लावतोचौथा किंगकॉँगला पोरीच्या प्रेमात पाडतोसगळं किती लॉजीकल चाललंय नाही!!!"

"ते प्राण्यांचे सिनेमे सोड रेत्याच्यासाठी तू सगळ्या इंग्लिश सिनेमांना नावं ठेवशील का?"

"मग कोणत्या सिनेमांविषयी बोलूसिनेमांच्या कथेचे साचे ठरलेले आहेतप्राण्यांच्या कथा,अंतराळातील कथासमुद्री कथाजगबुडीच्या कथाअतार्किक संकटाच्या कथाचोरीच्या सुरस कथा आणि महामानवाच्या कथा !! प्रत्येकवेळी तेच असतेफक्त कथेचं आवरण बदलते आणि उरते केवळ तंत्रज्ञान ! मी नावं ठेवत नाहीयेसुंदर सिनेमा हा कुठल्याही भाषेत बनू शकतोत्याला इंग्लिशच्या कोंदणाची गरज नाही."


तरी पण इंग्लिश सिनेमांचा फील वेगळाच असतो रे."

"आता या फीलगुड फॅक्टरवर काय बोलायचं? आता या फीलगुड फॅक्टरवर काय बोलायचं. एक शास्त्रज्ञ उगाचच एखादं आभासी जग तयार करतो. तिथं जाऊन मुळात अस्तित्वात नसलेल्या शत्रूंना मारतो. कश्याचा कशाला पत्ता नाही. कोण? कुठे ? कधी? कश्यासाठी? असे प्रश्न आपल्याला पडत नाहीत, पडले तर विचारायचे नाहीत. फक्त गुडी गुडी वाटून घ्यायचं.

"तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही."

मला आजवर एक गोष्ट कळू शकली नाहीये की एखादा इंग्रजी सिनेमा बघितल्याचा/ आवडल्याचा या लोकांना इतका अभिमान का असतो ? कौतुक तर इतके की जणू  काही स्पीलबर्ग किंवा नोलानने   यांचा सल्ला घेऊनच सिनेमा बनवला आणि एवढंच  नव्हे तर ह्यांच्या परसातल्या बागेतच शूटिंग झालंय बरचसंअसो.तर अश्या प्रकारे फील गुड फॅक्टरवर येउन आमची चर्चा संपली. नंतर मी विचार करत होतो की आपण आजकाल बघत नाही वगैरे ठीक आहे पण जसा बऱ्याच लोकांना हिंदी/मराठी सिनेमे बघण्याचा अभिमान असतो तसा मला इंग्लिशच्या बाबतीत  आहे का?.......नाही ! आजही टीव्हीवर "Speed" किंवा "Independance Day" लागला की मी भक्तीभावाने पाहायला बसतो का?.....हो! फरक एवढाच आहे की त्याच भक्तीभावाने मी आजही "दिवार" बघतो आणि त्याच हक्काने "सुर्यवंशम" लाथाडतो. इंग्लिश सिनेमांच्याबाबतीत हे घडताना दिसत नाही. कारण एकंच....

"इंग्लिश सिनेमांचा फील वेगळाच असतो रे!!!!

 --चिनार