परवा प्रियदर्शनचा खट्टामीठा सुरु होता. नेमका तो रोड रोलर नेण्याचा प्रसंग बघण्यात आला. हा एक अफाट विनोदी सीन आहे.
प्रचंड नुकसानीत असलेला कंगाल कॉन्ट्रॅक्टर सचिन टिचकुले (अक्षय कुमार) नगरपालिकेविरोधात एक कोर्टकेस जिंकतो. आणि नुकसानभरपाई म्हणून त्याला पालिकेच्या मालकीचा रोड रोलर मिळतो. पण तो रोड रोलर नादुरुस्त आहे हे टिचकुलेला माहिती नसतं. रोलर चालवण्यासाठी स्पेशालिस्ट ड्रायव्हर जॉनी लिव्हरला बोलावण्यात येते. आणि रोडरोलर पुराण सुरु होते. जॉनी लिव्हरने टिपिकल ड्रायव्हरच्या भूमिकेचं बेयरिंग अचूक पकडलं आहे. रोलर सुरु होत नाही हे पाहून,"अभी मेरेको समझ में आया इसका प्रॉब्लेम क्या है" असं दर दोन मिनिटांनी जॉनी म्हणत असतो. शेवटी पूर्ण इंजिन,गियरबॉक्स उघडूनही रोलर चालू होत नाही हे पाहून तो हत्तीच्या साहाय्याने ओढण्यात येतो. मग एका चढाईच्या रस्त्यावर दोर तुटून रोलर खाली घसरायला लागतो. कोपऱ्यावर असलेल्या नीरज व्होराच्या घराची भिंत तोडून रोलर पार लिविंग रूमपर्यंत पोहोचतो. काहींच्या काही आहे हा सीन पण दरवेळी बघताना मी पोट धरून हसतो.
विनोदी पंच नसलेले असे सिचुएशनल कॉमेडी सिन लिहिणं आणि पडद्यावर साकारणं अवघडच असतं. इथं स्क्रीनप्ले, कॅमेरा अँगल आणि कलाकारांचे एक्प्रेशन्स फार महत्त्वाचे असतात. ह्या प्रसंगात फुकाचा ऍटिट्यूड असेलला ड्रायव्हर,सतत पैसे खर्च करून काहीच हाती न लागल्याने फस्ट्रेट झालेला कॉन्ट्रॅक्टर , कॉट्रॅक्टरला शांत करून काही ना काही उरफाट्या आयडीया देणारा नोकर आणि ह्या सगळ्याशी काहीच संबंध नसताना उगाचच ह्यात गुरफटला गेलेला कोपऱ्यावरचा घरमालक ह्या चारही भूमिका अनुक्रमे जॉनी लिव्हर, अक्षय कुमार,राजपाल यादव अन नीरज व्होरा ह्यांनी फारच अफलातून केल्या आहेत.
या सगळ्यावर कडी म्हणजे प्रसंगातली शेवटची फ्रेम,
रोलरवर बसून घराची भिंत तोडून लिविंग रूममध्ये टीव्हीजवळ पोहोचल्यावर जॉनी म्हणतो,
"जरा स्पीड से अगर और आते ना, हमलोग वो रोड पे पहुचते थे...आई शप्पथ !"
प्रियदर्शनच्या सिनेमात असे प्रसंग बरेचदा पाहायला मिळतात. ह्याच सिनेमात पुढे सचिन टिचकुले बहिणीच्या लग्नासाठी म्हणून उधार मागायला एका हार्डवेयर शॉपच्या मालकाकडे (असरानी) जातो. तिथं दुकानातलाच एक कर्मचारी अतुल परचुरेसुद्धा आईच्या इलाजासाठी मालकाकडे पैसे मागायला आला असतो. त्याचवेळी असरानीला बायकोचा आणि ग्राहकाचा फोन एकाच वेळी आला असतो. चौघांशी बोलताना त्याला कन्फ्युजन होते. हा थोडासा ब्लॅक कॉमेडी प्रकारात येणार प्रसंगही मस्त जमला आहे.
प्रियदर्शनच्याच 'हंगामा' सिनेमात आणखी एक अफलातून प्रसंग आहे. वेडा समजून राजपाल यादवला पकडायला पोलीस इन्स्पेकटर (मनोज जोशी) एका लॉजमध्ये येतात आणि आरडाओरडा चालू करतात. आणि ह्या सगळ्या प्रकारावर चिडलेला राजपाल पोलीस, लॉजचा नोकर, लॉजचा मालक अश्या सगळयांना धोपटून काढतो.
दुल्हेराजा सिनेमाचा शेवटचा प्लॉट, हा शाब्दिक आणि सिच्युएशनल अश्या दोन्ही विनोदी प्रकारात मोडणारा एक आयकॉनिक सीन आहे. गोविंदा काय प्रतीचा कलाकार आहे ते ह्या प्रसंगात दिसते.
संजीव कुमारजी आणि देवेन वर्मा सर ह्यांचा अंगुर सिनेमा म्हणजे तर विनोदी लेखनाची कार्यशाळा आहे. खूप वैतागलेला संजीव कुमार पोलीस स्टेशनला जाण्यासाठी एका ऑटोवाल्याला पत्ता विचारतो,
"अरे ये पुलीस स्टेशन कहा है?"
"साहब, पुलीस स्टेशन...छोटा या बडा?"
ह्यावर आणखी वैतागून संजीव कुमार म्हणतो,
"मुझे खरीदना नही है! कंपलेंट लिखानी है भाई!"
ही विनोदाची सर्वोच्च पातळी आहे! इथला रस्ता सापडला पाहिजे!
विनोदात लेयर्ड विनोद नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे वेगवेगळे थर (लेयर) असलेला विनोद. तो ह्या प्रसंगात आहे. म्हणजे बघा, कोणीतरी पत्ता विचारल्यावर सरळ न सांगता आगाऊपणे प्रतिप्रश्न करणं (छोटा या बडा?) हा पहिला थर. नंतर संजीव कुमारच हे पात्र आधीच्या घटनांमुळे खूप वैतागलेलं असतं. त्यात हा प्रतिप्रश्न ऐकून तो आणखी चिडतो. संजीवजी ज्या पद्धतीने,"मुझे खरीदना नही है" हे वाक्य डिलिव्हर करतात त्यात त्या पात्राचं अक्ख्या कथेतलं फस्ट्रेशन विनोदी पद्धतीनं बाहेर येते. हा विनोदाचा दुसरा थर. अर्थात हे करायला त्या तोडीचा अभिनेता असावा लागतो. आणि शेवटचा थर म्हणजे, नेमकं पोलिसांच्याच संदर्भात वापरलेलं,"मुझे खरीदना नही है" हे रूपक !!
विनोदी प्रसंग हा माझा आवडीचा विषय आहे. रडवण्यापेक्षा हसवणं हे फार कठीण असतं.
तुम्हाला आवडणारे विनोदी प्रसंग जरूर लिहा.

No comments:
Post a Comment