मामाचं पत्र हरवलंय की पत्र लिहिणारा मामाचं हरवलाय ?
एक काहीतरी नक्कीच हरवलंय !
एक काहीतरी नक्कीच हरवलंय !
कोंबड्याचं आरवण थांबलंय की ती सकाळ व्हायचीच थांबलीय ?
एक काहीतरी नक्कीच थांबलय !
पाटीवर अभ्यास लिहायचा राहिलाय की आमची पाटी कोरीच राहिलीय ?
एक काहीतरी नक्कीच राहिलंय !
मऊ वरण-भात करपलाय की आमची जीभच करपलीय ?
एक काहीतरी नक्कीच करपलय !
संवाद कमी झालाय की विसंवाद वाढलाय ?
एक काहीतरी नक्कीच झालंय
आमचं वय वाढलंय की आमच्यातलं अंतर वाढलंय ?
एक काहीतरी नक्कीच वाढलंय
शुभं करोति म्हणायचं विसरलोय की शुभ म्हणजे काय तेच विसरलोय ?
एक काहीतरी नक्कीच विसरलोय !
रामाची गोष्ट संपली आहे की प्रत्येक गोष्टीतला रामच संपलाय ?
एक काहीतरी नक्कीच संपलय !!
एक काहीतरी नक्कीच थांबलय !
पाटीवर अभ्यास लिहायचा राहिलाय की आमची पाटी कोरीच राहिलीय ?
एक काहीतरी नक्कीच राहिलंय !
मऊ वरण-भात करपलाय की आमची जीभच करपलीय ?
एक काहीतरी नक्कीच करपलय !
संवाद कमी झालाय की विसंवाद वाढलाय ?
एक काहीतरी नक्कीच झालंय
आमचं वय वाढलंय की आमच्यातलं अंतर वाढलंय ?
एक काहीतरी नक्कीच वाढलंय
शुभं करोति म्हणायचं विसरलोय की शुभ म्हणजे काय तेच विसरलोय ?
एक काहीतरी नक्कीच विसरलोय !
रामाची गोष्ट संपली आहे की प्रत्येक गोष्टीतला रामच संपलाय ?
एक काहीतरी नक्कीच संपलय !!
खूपच छान !!! मस्तच.
ReplyDeleteचांगलंय ....
ReplyDeleteचिरंजीव चिनार ,
ReplyDeleteसप्रेम" आशीर्वाद. तुझ्या ब्लोग वर थोडीशी मुशाफिरी केली ,प्रथमदर्शनीच कळले कि हे लिखाण वाचनीय आहे.रामाची गोष्ट संपली आहे की प्रत्येक गोष्टीतला रामच संपलाय ?
एक काहीतरी नक्कीच संपलय !!
ह्या तुझ्यामाझ्या सर्वांच्याच व्यथेला शब्द देणारी हि कविता फार आवडली ,संपणाऱ्या गोष्टीचा मागोवाच तुला मला आपल्या सर्वाना एक संवादाचा सूर देऊन जाईल .
असेच लिहित जा तुझ्यास्ठी आणि आम्हा सर्वांसाठीही.
शशांक रांगणेकर
९८२१४५८६०२
धन्यवाद !
Deleteमाझ्या ब्लोग वर तुमचा प्रतिसाद मिळाला. अत्यंत आपुलकीने तुम्ही दिलेला आशीर्वाद घेताना खूप छान वाटतंय. यापुढेही चांगलं लिहिण्याचा मनापासून प्रयत्न करेल.
Very nice!!!
ReplyDeleteखूप सुंदर ..
ReplyDeleteKhup chhan
ReplyDelete