Thursday, 12 February 2015

काही विस्कळीत प्रश्न

काही विस्कळीत प्रश्न
विषय - स्विस बँक
. स्विस बँकेतला सगळा पैसा काळाचं असतो का ?
. स्विस बँकवाले ," आमच्या येथे काळे पैसे स्वीकारले जातात" अशी जाहिरात करतात का ?
. स्विस बँकेची भारतात शाखा आहे का ?
. स्विस बँकेत खातं उघडायला कुठली कागदपत्र लागतात ?
विषय - आंतरराष्ट्रीय बाजार
. आंतरराष्ट्रीय बाजार नक्की कुठे भरतो ?
. या बाजारात मोलभाव होतो का ? की "एकच भाव" अशी पाटी असते ?
. अमेरिकेचा माल विकला गेला नाही म्हणजे 'आर्थिक मंदी ' असा नियम आहे का ?
विषय - महागाई
. तेलाचे भाव वाढले तरी महागाई वाढते , कमी झाली तरी वाढते, असं का ?
. महागाई दराला अप्पर कट ऑफ का नसतो ?
. स्थिर महागाई दर म्हणजे काय ? शेवटी महागाई ती महागाईचं ना ?
. महागाई दरासारखा 'स्वस्ताई दर' सुद्धा मोजतात का ? की मोजता येत नाही इतका कमी असतो ?
विषय -स्विस बँक,आंतरराष्ट्रीय बाजार,महागाई आणी भारत सरकार
. भारत सरकार स्विस बँकेची भारतात शाखा उघडून सगळा काळा पैसा तिथेच का ठेवत नाही ?
. आंतरराष्ट्रीय बाजार भारतात भरवून संसदेतले सगळे नमुने तिथे विकायला का ठेवत नाही ? जाहीर लिलाव केला तरी चालेल !
. महागाई जर कायमच राहणार असेल तर तिला भारताचे नागरिकत्व देण्यास काय हरकत आहे ?


No comments:

Post a Comment